इस्रायली पंतप्रधान बेनेट यांचा एप्रिलमध्ये भारत दौरा !

इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट हे एप्रिल मासात भारताच्या दौर्‍यावर येणार आहेत. पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर हा त्यांचा पहिलाच भारत दौरा असून यामध्ये रशिया-युक्रेन युद्ध यांमुळे पालटत असलेली भूराजकीय समीकरणे, तसेच उभय देशांमधील संबंधांना नव्या स्तरांवर घेऊन जाण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलणे, हा या दौर्‍याचा उद्देश असेल, असे इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.

(सौजन्य : WION)

पंतप्रधान मोदी आणि बेनेट यांची गेल्या वर्षी ऑक्टोबर मासात ‘ग्लासगो समिट’मध्ये प्रथम भेट झाली होती.