मुंबई – राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांची न्यायालयीन कोठडी ४ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. नवाब मलिक यांना पाठदुखीचा त्रास असल्यामुळे त्यांनी स्वतःचा पलंग वापरण्यास अनुमती मिळावी, अशी मागणी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली. नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्याशी निगडित आर्थिक व्यवहाराच्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मलिक हे आधी ‘ईडी’ कोठडीत आणि नंतर न्यायालयीन कोठडीत होते. मलिक यांच्या प्रकरणात तथ्य आहे. म्हणूनच त्यांच्या कोठडीत वाढ होत आहे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.