होळी हा व्यक्तीतील दुष्प्रवृत्ती आणि अमंगल यांचा नाश करून सन्मार्ग दाखवणारा सण ! – सौ. इप्शिता पटनायक, हिंदु जनजागृती समिती

होळीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रम

धनबाद (झारखंड) – होळी हा व्यक्तीतील दुष्प्रवृत्ती आणि अमंगल यांचा नाश करून तिला सन्मार्ग दाखवणारा सण आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. इप्शिता पटनायक यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने होळीनिमित्त एका विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाचा लाभ पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत, तसेच नेपाळ येथील जिज्ञासूंनी घेतला. सूत्रसंचालन कु. आद्या सिंह हिने केले.