माझ्या सांगण्यावरून खासदारांच्या मुलांना उमेदवारी नाकारली ! – पंतप्रधान मोदी यांची घराणेशाहीवर टीका

पक्षात घराणेशाही चालणार नाही. भाजपच्या नेत्याच्या आणि खासदाराच्या कुटुंबियांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्यास तो निर्णय माझ्या सांगण्यावरून झाला आहे. जर हे पाप असेल, तर ते मी केले आहे.

रशियाकडे केवळ १० दिवस पुरेल इतकाच दारुगोळा शिल्लक ! – अमेरिकेच्या माजी सैन्यदल प्रमुखाचा दावा

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला २० दिवस झाले असले, तरी ते अद्याप थांबलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर ‘रशियाकडे केवळ १० दिवस उरले आहेत. या १० दिवसांत युक्रेनने खिंड लढवली, तर रशिया आपोआपच चितपट होईल, असा दावा अमेरिकेचे माजी सैन्यदल प्रमुख बेन होजेस यांनी केला आहे.

दडपलेले सत्य उघड झाल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले गोंधळले आहेत ! – पंतप्रधान

‘द कश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट बनायला हवेत. अशा चित्रपटांतून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला, ते समोर आणले जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते आज विरोध करत आहेत.

(म्हणे) ‘केंद्र सरकारने अर्थसंकल्पात विस्थापित काश्मिरींसाठी काहीही केले नाही !’ – सुप्रिया सुळे यांची लोकसभेत टीका

केंद्र सरकारने काश्मिरी हिंदूंसाठी काहीही केले नाही, असे सांगणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी ‘त्यांच्या पक्षाने काश्मिरी हिंदूंसाठी इतक्या वर्षांत आवाज का उठवला नाही ?’, याचे प्रथम उत्तर द्यावे !

इस्लामी टोळ्यांकडून काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेदच ! – अमेरिकेतील र्‍होड आइलँड संसदेची ठाम भूमिका

भारतातील काँग्रेस पक्ष काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाचे सत्य दडपतो, तर अमेरिकेतील एका राज्याची संसद काश्मिरी हिंदूंच्या बाजूने ठाम उभी रहाते. हे काँग्रेसला लज्जास्पद !

रशियाकडून युद्धाच्या २० व्या दिवशीही युक्रेनवर आक्रमणे चालूच !

रशियाकडून येथील रहिवासी इमराती आणि एक मेट्रो स्थानक यांवर १५ मार्चच्या सकाळी हवाई आक्रमणे करण्यात आली. एका इमारतीवर केलेल्या आक्रमणात २ जण ठार झाल्याचे वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे.

महाविकास आघाडी शासनाच्या कार्यकाळात ‘औरंगाबाद’चे नामकरण ‘संभाजीनगर’ होईल !  – अंबादास दानवे, शिवसेना

संभाजीनगर येथील विमानतळाला धर्मवीर संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे; मात्र अद्याप हे नामकरण करण्यात आलेले नाही.

पेनड्राईव्ह बॉम्बप्रकरणाची ‘सीआयडी’द्वारे चौकशी करणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

२२ वर्षांत दिलीप वळसे पाटील इतके हतबल झालेले मी पाहिले नाही ! – देवेंद्र फडणवीस

महाशिवरात्रीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड, तसेच पुणे येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन, फलक प्रदर्शन आणि व्याख्याने यांद्वारे करण्यात आलेला व्यापक धर्मप्रसार !

महाशिवरात्रीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने विविध माध्यमातून व्यापक धर्मप्रसार करण्यात आला, त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .

हिजाबबंदीवर कर्नाटक उच्च न्यायालयाची मोहोर ! : जाणून घ्या प्रत्येक महत्त्वपूर्ण #Update

हा निकाल दोन गोष्टींच्या आधारे घेण्यात आला आहे. पहिली म्हणजे हिजाब घालणे हे राज्यघटनेच्या कलम २५ नुसार धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या कक्षेत येते का ? दुसरी असे की, शाळेचा गणवेश अनिवार्य असणे, हे या अधिकाराच्या विरोधात आहे का ?