इस्लामी टोळ्यांकडून काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेदच ! – अमेरिकेतील र्‍होड आइलँड संसदेची ठाम भूमिका

  • काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या घटनेला मान्यता

  • काश्मिरी हिंदूंच्या बाजूने ठराव संमत

  • ‘द कश्मीर फाइल्स’चे केले अभिनंदन

  • अशी भूमिका भारतीय संसदेनेही घेतली पाहिजे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक
  • भारतातील काँग्रेस पक्ष काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाचे सत्य दडपतो, तर अमेरिकेतील एका राज्याची संसद काश्मिरी हिंदूंच्या बाजूने ठाम उभी रहाते. हे काँग्रेसला लज्जास्पद ! – संपादक
  • हिंदूबहूल भारतातील एकही राजकारणी आजही या घटनेची चौकशी करण्याची मागणी करत नाही, हे लक्षात घ्या ! त्यामुळे हिंदूंनीच आता काश्मिरी हिंदूंना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे ! – संपादक

नवी देहली – काश्मीर खोर्‍यात १९९० च्या दशकात झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा प्रभाव केवळ भारतातच नाही, तर जगभरात उमटत आहे. अमेरिकेच्या र्‍होड आइलँड संसदेमध्ये काश्मिरी हिंदूंच्या बाजूने ठराव संमत करण्यात आला आहे. इस्लामी टोळ्यांनी काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद केल्याच्या घटनेला त्यांनी मान्यताही दिली आहे. काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार सर्वांसमोर आणणार्‍या ‘द कश्मीर फाइल्स’चे या संसदेने अभिनंदन केले आहे, अशी माहिती ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नवी देहली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी ‘ग्लोबल काश्मिरी पंडित डायस्पोरा’चे अध्यक्ष डॉ. सुरिंदर कौल उपस्थित होते.

अमेरिकेतील एक प्रगत राज्य असलेल्या र्‍होड आइलँडने म्हटले आहे, ‘१९९०च्या दशकात इस्लामी टोळ्यांनी ५ लाख काश्मिरी हिंदूंच्या केलेल्या वंशविच्छेदाचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. त्याद्वारे काश्मीर खोर्‍यातील आतंकवाद आणि कट्टरतावाद यांविषयीची माहिती यात विशद करण्यात आली आहे. काश्मिरी हिंदूंना निर्वासितांसारखे जीवन जगण्यास भाग पाडण्यात आले. या वेळी संसदेने ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे अभिनंदनही केले.