हिंदूंना धर्मशिक्षित करण्यासाठी मंदिरांनी धर्मशिक्षणाचे केंद्र बनले पाहिजे ! – धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

‘महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरांच्या माध्यमातून धर्मप्रसाराचे कार्य विहंगम पद्धतीने कसे करू शकतो?’, याविषयी मार्गदर्शन केले.

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील धर्मप्रेमी श्री. किशन शर्मा यांच्या नातेवाईकांना मृत्यूत्तर सद्गती मिळावी, यासाठी ‘साधना’ विषयावरील प्रवचनाचे केले आयोजन !

हिंदु जनजागृती समितीद्वारे मनुष्य जीवनातील साधनेचे महत्त्व, ‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपाने पूर्वजांना सद्गती कशी मिळते ? आदींविषयी माहिती सांगितली गेली.

रशियाकडून युक्रेनच्या सैन्यतळावर झालेल्या आक्रमणात ७० सैनिक ठार

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या ६ व्या दिवशी रशियाने युक्रेनच्या ओख्तियार्क शहरातील सैन्यतळावर मोठे आक्रमण केले. यात युक्रेनचे ७० हून अधिक सैनिक ठार झाले आहेत.

सिद्धलिंग स्वामीजी यांच्यासह प्रमोद मुतालिक आणि महिला हिंदुत्वनिष्ठ यांना ३ मार्चपर्यंत कलबुर्गी जिल्ह्यात प्रवेशबंदी !

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले की, ‘कलबुर्गी जिल्हा प्रशासनाची भूमिका हिंदुविरोधी आहे.

शिवसेनेचे यशवंत जाधव यांच्या १२ हून अधिक शेल आस्थापना असल्याचे उघडकीस !

आस्थापना कायद्यानुसार या आस्थापनांमध्ये काही त्रुटीदेखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे आता यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

‘फोन टॅपिंग’प्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा ‘जबाब’ नोंदवणार !

पुणे पोलीस आयुक्त असतांना शुक्‍ला यांनी नेत्यांच्या ‘फोन टॅपिंग’साठी अनुमती घेतांना ग्राहक अर्ज आवेदन पत्र (सी.ए.एफ्.) गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना सादर करणे आवश्यक होते. प्रत्यक्षात त्यांनी संबंधित पत्रच सादर केले नसल्याचेही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

संभाजीनगर येथे विद्यार्थिनीच्या छळाचा आरोप असलेले अधिष्ठाता वडजे यांची समितीकडून चौकशी चालू !

अधिष्ठातासारख्या उच्च पदावर असणार्‍या अधिकार्‍यांनी विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणे संतापजनक आणि लज्जास्पद आहे ! ८ वर्षांपूर्वी त्यांच्यावर कठोर कारवाई न झाल्याचाच हा परिणाम आहे !

धुळे येथील युवतीने केला दोन टवाळखोरांचा प्रतिकार !

असा प्रसंग कोणत्याही युवतीवर ओढवू शकतो. त्यामुळे प्रत्येक युवतीने स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हायला हवे. या प्रसंगातून अन्य युवतींनीही बोध घ्यावा ! धैर्याने टवाळखोरांना चोप देणार्‍या युवतीचे हार्दिक अभिनंदन !

चाकण (पुणे) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कसायांच्या कह्यातून ७ गोवंशियांची सुटका केली !

हिंदुत्वनिष्ठ संघटना गोरक्षण करत आहेत, म्हणून गोरक्षण होत आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?