रशियाकडून युक्रेनच्या सैन्यतळावर झालेल्या आक्रमणात ७० सैनिक ठार

प्रतीकात्मक छायाचित्र

कीव (युक्रेन) – युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या ६ व्या दिवशी युद्धाने अत्यंत भीषण रूप धारण केले आहे. रशियाने युक्रेनच्या ओख्तियार्क शहरातील सैन्यतळावर मोठे आक्रमण केले. यात युक्रेनचे ७० हून अधिक सैनिक ठार झाले आहेत. हे शहर खारकीव आणि कीव या शहरांच्या मध्ये आहे. रशियाचे सैन्य वेगाने युक्रेनची राजधानी कीवकडे आगेकूच करत आहे. रशियाने आक्रमणाची तीव्रता वाढवली आहे. रशियाचा सैन्य ताफा ६४ किमी लांब असल्याचे उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रातून समोर आले आहे. रशियाने युक्रेनमध्ये पाठवलेली आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कुमक आहे.

रशियाने टाकला खारकीवच्या मुख्य सरकारी कार्यालयावर बाँब !

रशियाने राजधानी कीवनंतर सर्वांत महत्त्वाचे शहर असणार्‍या खारकीवच्या मुख्य सरकारी इमारतीवर बाँब टाकला आहे.