चाकण (पुणे) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कसायांच्या कह्यातून ७ गोवंशियांची सुटका केली !

  • गोवंश हत्याबंदीचा कायदा असतांना पोलीस गोतस्करांवर स्वत:हून कारवाई का करत नाहीत ? – संपादक 
  • हिंदुत्वनिष्ठ संघटना गोरक्षण करत आहेत, म्हणून गोरक्षण होत आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? गोवंशियांच्या तस्करीच्या बातम्या गोरक्षकांनाच अगोदर कशा काय कळतात ? याचा पोलिसांनी विचार करायला हवा ! – संपादक 

चाकण (जिल्हा पुणे) – येथील बाजारात २६ फेब्रुवारी या दिवशी २ टेम्पो गोवंशियांची अवैधरित्या वाहतूक करत असल्याचा गोरक्षकांना संशय आल्याने या गाड्यांची पहाणी केली असता त्यामध्ये कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या एकूण ५ गायी आढळून आल्या. या वाहनाचा मालक रशीद काझी याच्यावर अनेक वेळा गुन्हे नोंद झालेले आहेत. त्यामुळे दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात नेण्यात आली. सदर वाहनांची खरेदी करणारा नाथा कोळेकर हा कसायांचा हस्तक असल्याने त्याचा आरोपींमध्ये समावेश करण्यात आला. यामुळे चाकणच्या बाजारात हिंडणारे नकली शेतकरी आणि कसायांचे हस्तक यांना योग्य संदेश मिळाला आहे. प्रत्येक शनिवारी चाकणच्या बाजारात उपस्थित राहून ‘गोहत्यामुक्त बाजार’ करण्याचा बजरंग दलाचा निर्धार आहे. या प्रकरणी रशिद काझी, सलमान शेख, गुलाब शेख आणि अन्य २ गोमाफिया यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बाजारात आढळलेले २ बेवारस बैल सुद्धा गोरक्षकांनी कह्यात घेतले. पिंपरीचे मानद पशूकल्याण अधिकारी अभिजित चव्हाण आणि नीलेश चासकर यांच्या नेतृत्वाखाली निखिल शिंदे, गणेश लांडे आदी गोरक्षकांनी चाकणची मोहीम यशस्वी केली आहे. (गोरक्षकांचे अभिनंदन ! – संपादक)