गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील धर्मप्रेमी श्री. किशन शर्मा यांच्या नातेवाईकांना मृत्यूत्तर सद्गती मिळावी, यासाठी ‘साधना’ विषयावरील प्रवचनाचे केले आयोजन !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – येथील धर्मप्रेमी श्री. किशन शर्मा यांच्या मोठ्या काकांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांना सद्गती प्राप्त व्हावी आणि संपूर्ण कुटुंबाला मृत्यूत्तर श्राद्धादी विधीचे अध्यात्मशास्त्र समजावे, यासाठी श्री. शर्मा यांनी कुटुंबातील सदस्यांसाठी एका ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन केले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे गोरखपूर समन्वयक श्री. प्रशांत वैती यांनी मनुष्य जीवनातील साधनेचे महत्त्व, ‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपाने आपल्या पूर्वजांना सद्गती कशी मिळते ? आदींविषयी माहिती सांगितली.

वैशिष्ट्यपूर्ण

श्री. किशन शर्मा हे समितीच्या ‘ऑनलाईन’ साप्ताहिक धर्मशिक्षण वर्गाला नियमित जोडलेले असतात. ‘आपल्याला समजलेले साधनेचे महत्त्व कुटुंबातील अन्य सदस्यांनाही समजावे आणि त्यांनी साधनेला प्रारंभ करावा’, यासाठी श्री. शर्मा यांनी ‘ऑनलाईन’ साधना प्रवचनाचे आयोजन केले होते. समितीविषयी कृतज्ञता व्यक्त करतांना श्री. किशन शर्मा म्हणाले, ‘‘समितीमुळेच मला जीवनात साधनेचे महत्त्व समजले.’’