छतरपूर (मध्यप्रदेश) येथील मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर ‘सेकंड हँड जवानी’ गाण्यावर नृत्य करणार्‍या तरुणीचा बजरंग दलाकडून विरोध

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा प्रकारचे अयोग्य कृत्य करतात आणि मंदिरांचे पावित्र्य अन् महत्त्व न्यून करतात, हे लक्षात घ्या ! संपादक

मंदिराच्या प्रवेशद्वारावर नृत्य करताना आरती साहू

छतरपूर – मध्यप्रदेश राज्यातील छतरपूरमधील नजराय टोरिया मंदिराच्या प्रवेशद्वारावर आरती साहू नावाच्या तरुणीने ‘सेकंड हँड जवानी’ या हिंदी गाण्यावर नृत्य केल्याचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर बजरंग दलाने याचा विरोध केला आहे. ‘हिंदु संस्कृतीला अपकीर्त करणार्‍यांना समाजामध्ये रहाण्याचा अधिकार नाही’, असे दलाने म्हटले आहे.

१. याविषयी मंदिराचे महंत भगवानदास यांनी सांगितले की, अशा प्रकारे नृत्य करणे अयोग्य आहे. मठ, मंदिर आणि आश्रम यांना अपकीर्त करू नये. तसे करणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे.

२. याविषयी नृत्य करणारी तरुणी आरती साहू म्हणाली की, या नृत्याच्या व्हिडिओमध्ये असे काहीच नाही, ज्यामुळे त्यास विरोध केला पाहिजे. यात काहीच अश्‍लील नाही. माझे कपडेही तोकडे नाहीत.