|
|
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर यांना नियोजनबद्धरित्या वसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्याच्या गुप्तचर विभागाने सरकारला याविषयी दिलेल्या गोपनीय अहवालाच्या आधारावर आता राज्य सरकार भूमी खरेदी आणि विक्री यांविषयी कठोर कायदा करण्याच्या सिद्धतेत आहे. विशेष म्हणजे जेथे हिंदूंची प्रसिद्ध तीर्थस्थळे आहेत, त्या ठिकाणांसाठी हा कायदा करण्याचा विचार आहे.
१. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार बद्रीनाथ, हरिद्वार, ऋषिकेश आदी ठिकाणी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर यांची संख्या वाढतांना दिसत आहे. तसेच गंगानदीच्या किनारीही ते वाढत आहेत.
२. हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संशय आहे की, यामागे एक षड्यंत्र आहे. हा ‘भूमी जिहाद’चा प्रकार असूू शकतो, अशीही हिंदूंना भीती आहे. त्यामुळे सरकारने याकडे सतर्कतेने लक्ष दिले पाहिजे. ‘भूमी जिहाद’ म्हणजे धर्मांधांकडून त्यांच्या पंथाव्यतिरिक्त इतरांची विशेषत: हिंदूंची भूमी बळकावण्यासाठी रचलेले षड्यंत्र.
३. राज्यातील पर्वतीय भागांमधून हिंदू त्यांची घरे रिकामी करत आहेत. या ठिकाणी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर स्थानिक लोकांची भूमी खरेदी करून रहात आहेत. गेल्या २ दशकांपासून असे होत आहे. बद्रीनाथ, हरिद्वार आणि ऋषिकेश येथे अशा प्रकारे त्यांची संख्या वाढली आहे. त्यांची लोकसंख्या ३५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.