आज शेतकरी संघटनांचा ‘भारत बंद !’

अनेक राजकीय पक्ष आणि सरकार यांचे ‘बंद’ला समर्थन

‘बंद’ पाळणे म्हणजे देशाची अब्जावधी रुपयांची हानी करणे होय ! ‘बंद’चे आवाहन करणार्‍या अशा संघटना आणि त्यांना समर्थन देणारे राजकीय पक्ष यांच्यावर देशाची हानी केल्यासाठी बंदीच घातली पाहिजे ! – संपादक

नवी देहली – केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटनांनी  २७ सप्टेंबर या दिवशी ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. एकूण ४० संघटनांनी हे आवाहन केले आहे. सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हा ‘बंद’ असणार आहे. या ‘बंद’तून आपत्कालीन सेवा वगळण्यात आल्या आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी या ‘बंद’चे समर्थन केले आहे, तसेच काँग्रेस, आम आदमी पक्ष, बसप, आंध्रप्रदेश सरकार, तृणमूल काँग्रेस, माकप, जनता दल (संयुक्त) तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम – द्रविड प्रगती संघ) यांनी समर्थन दिले आहे.