युरोपमधील लिथुआनिया देशात चिनी भ्रमणभाष संच न वापरण्याची नागरिकांना सूचना

भारत सरकारनेही अशी सूचना नागरिकांना दिली पाहिजे ! – संपादकीय

विलनियस (लिथुआनिया) – युरोपमधील लिथुआनिया देशाच्या सरकारने नागरिकांना चिनी भ्रमणभाष संच फेकून देण्यास सांगत भविष्यात ते विकत न घेण्याची सूचना केली आहे. सरकारी अहवालात ‘चिनी भ्रमणभाष संच आणि अन्य उपकरणे यांच्यामुळे धोका निर्माण होत असल्याने ते वापरू नयेत’, असे म्हटले आहे.

या देशाच्या सायबर सुरक्षा यंत्रणेने म्हटले आहे की, चीनच्या ‘शाओमी’ या प्रसिद्ध आस्थापनाकडून युरोपमध्ये विकल्या जाणार्‍या भ्रमणभाष संचामध्ये ‘तिबेट’, ‘तैवान’, ‘लोकशाही’ आदी शब्दांचा वापर झाल्यास त्या संचांचा शोध घेणारे यंत्र बसवले आहे. तिबेट आणि तैवान यांविषयी जगभरात काही घडल्यास त्याची माहिती मिळवण्यासाठी चीन असा प्रयत्न करत आहे.