(म्हणे) ‘ओणम् सणाच्या वेळी गर्दी करू नका !’  

केरळ राज्य कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतून मुक्त झाले नसल्याचे वीणा जॉर्ज यांना ईदच्या वेळी आठवले नाही का ?

कोरोना रुग्णांसाठी गुणकारी ठरलेल्या अश्‍वगंधा औषधावर ब्रिटनमध्ये संशोधन !

आयुर्वेदावर संशोधन करून त्याचा स्वतःच्या देशाला लाभ मिळवून देऊ पहाणारा ब्रिटन !

देहली येथे ८ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रभक्तांचे भव्य आंदोलन !

इंग्रजांनी लादलेले कायदे रहित करा ! धर्मांतर, गोहत्या, घुसखोरी यांविरोधात कायदे करा !

नागपूर येथे संघ मुख्यालयाजवळ भाजप आणि काँग्रेस पक्षांतील कार्यकर्ते एकमेकांशी भिडले !

एकमेकांशी हाणामारी करणारे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते जनतेचे प्रश्न सोडवून विकासकामे कधीतरी पूर्ण करू शकतील का ?

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्याकडून अभिवादन !

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीच्या निमित्ताने पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांकडून पूरग्रस्तांना राज्यातील अनेक जिल्ह्यात साहाय्य !

कर्नाटक राज्यातही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी प्रतिदिन पूरग्रस्तांना साहाय्य करत आहेत.

भारत ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’चा १ मासासाठी बनला अध्यक्ष !

भारत ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’चा एक मासासाठी अध्यक्ष बनला आहे. याविषयी पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता जाहिद हाफीज चौधरी यांनी म्हटले आहे की, भारत त्याच्या कार्यकाळामध्ये निष्पक्ष राहून योग्य निर्णय घेईल, अशी आशा आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना सरकारी नोकरी आणि पारपत्र मिळणार नाही !

राज्यात दगडफेक करणार्‍यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, तसेच पारपत्रही देण्यात येणार नाही, असा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याविषयीचा आदेश जारी करण्यात आला आहे.

अफगाणिस्तानच्या कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर तालिबानकडून रॉकेटद्वारे आक्रमण

तालिबानकडून कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेटद्वारे आक्रमण करण्यात आले. एकूण ३ रॉकेट डागण्यात आली. त्यांपैकी १ विमानतळावर, तर २ धावपट्टीवर पडली.

(म्हणे) ‘१४ ऑगस्टपर्यंत जिहाद्यांची सुटका न केल्यास परिणामांना सिद्ध रहा !’

अनेक मोठी मंदिरे आणि रा.स्व. संघ यांचे कार्यालय यांना धमकीची पत्रे मिळाली आहेत. यात ‘१४ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत जिहाद्यांची सुटका केली नाही, तर त्याचे परिणाम भोगण्यास सिद्ध रहा’, अशी धमकी देण्यात आली आहे.