नागपूर येथे संघ मुख्यालयाजवळ भाजप आणि काँग्रेस पक्षांतील कार्यकर्ते एकमेकांशी भिडले !

महाराष्ट्रात आपत्काळाची स्थिती असतांना पूरग्रस्तांना साहाय्य करण्याऐवजी एकमेकांशी हाणामारी करणारे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते जनतेचे प्रश्न सोडवून विकासकामे कधीतरी पूर्ण करू शकतील का ?

भाजप आणि काँग्रेस पक्षांतील कार्यकर्ते एकमेकांशी भिडले ! ( प्रातिनिधिक चित्र )

नागपूर – काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक बंटी शेळके यांनी महागाई आणि बेरोजगारी या प्रश्नांवर दुचाकी वाहन फेरी काढली. संघ मुख्यालयाचा परिसर हा दाटीवाटीचा असून सुरक्षेच्या कारणास्तव तिथे वाहतुकीवर अनेक निर्बंध आहेत; मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तेथूनच फेरी नेण्याचा हट्ट धरला. त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवल्यानंतर तेथे वाद निर्माण झाला. या वेळी दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की होऊन ते एकमेकांशी भिडले. या वेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

नागपूर येथेही भाजप आणि काँग्रेस या पक्षांतील कार्यकर्ते समोरासमोर येऊन त्यांच्यात वादावादी आणि धक्काबुक्की झाली. हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी वाद मिटवण्यासाठी हस्तक्षेप करून अधिकची कुमक मागवली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून मागे जावे लागले.