तळोजा (जिल्हा रायगड) येथील महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराज यांच्या मठातील वृद्धाश्रमाची जागा कह्यात घेण्यासाठी ‘सिडको’कडून थेट नोटीस !

हिंदूंचे संत आणि सेवाभावी संस्था यांना थेट नोटीस पाठवणार्‍या ‘सिडको’ने अन्य धर्मियांच्या संदर्भात असे धारिष्ट्य दाखवले असते का ?

अफगाणिस्तानमध्ये तालिबानला साहाय्य करण्यास गेलेले पाकच्या मदरशांतील तरुण होत आहेत ठार !

पाकच्या मदरशांतील अनेक जिहादी तरुण अफगाणिस्तानमध्ये तालिबानला साहाय्य करण्यासाठी गेले असून त्यांतील अनेक जण  युद्धामध्ये ठार झाले आहेत. त्यांचे मृतदेह पाकमध्ये पाठवण्यात येत आहेत.

नेहरू कुटुंबामुळे देशाची अर्थव्यवस्था बिघडली ! – मध्यप्रदेशातील भाजप सरकारमधील मंत्री विश्‍वास सारंग यांचा आरोप

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेला खिळखिळी करत महागाई वाढवण्याचे श्रेय कुणाला द्यायचे असेल, तर ते नेहरू कुटुंबाला द्यायला हवे. महागाई एक किंवा दोन दिवसांत वाढत नाही. अर्थव्यवस्थेचा पाया एक किंवा दोन दिवसांत उभारला जात नाही.

सर्व मुसलमान शिल्पकार भगवान विश्‍वकर्माचे वंशज !

सर्व शिल्पकार भगवान विश्‍वकर्मा यांचे वंशज आहेत. केवळ हिंदूच नाही, तर उत्तरप्रदेश मुसलमान शिल्पकारांनीही भरलेला आहे. बाबर त्याच्यासमवेत शिल्पकार घेऊन आला नव्हता. मध्यपूर्वेत शिल्पकार असूच शकत नाहीत.

पुणे येथील १७ वर्षीय नॅशनल हॉर्स रायडरची ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या !

जीवनात घडणार्‍या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि आत्महत्या करणे अयोग्य आहे, हे समजण्यासाठी धर्मशिक्षणच हवे !

आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून लोकमान्य टिळकांना विनम्र अभिवादन !

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी टिळक स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांच्यावर कथित भडकाऊ टिपण्या केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने हा पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचाच प्रयत्न आहे. देशातील प्रसारमाध्यमे याचा संघटितपणे विरोध का करत नाहीत ?

निधन वार्ता

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील सनातनच्या साधिका सौ. शकुंतला दिगंबर खरात यांची आई कलावती सिताराम पारेकर (वय ८० वर्षे) यांचे खर्डी (तालुका पंढरपूर) येथे १ ऑगस्ट या दिवशी दीर्घकालीन आजाराने निधन झाले.

देहलीमधील एका उड्डाणपुलावर अवैधरित्या बांधण्यात आली मजार !

उड्डाणपुलावर मजार बांधेपर्यंत देहली प्रशासन काय करत होते आणि अजूनही ती मजार अस्तित्वात असतांना प्रशासन काय करत आहे, हे जनतेला समजले पाहिजे !

निधन वार्ता

अमरावती येथील सनातनचे साधक श्री. श्रीकांत मुळावकर यांचे वडील शरद नारायणराव मुळावकर (वय ८४ वर्षे) यांचे ३१ जुलै या दिवशी अल्पशा आजाराने  निधन झाले.