पाकमधील श्री गणपति मंदिरावरील आक्रमणाच्या निषेधाचा ठराव ‘खैबर पख्तुनख्वा प्रांतीय विधानसभे’मध्ये संमत

ठराव करून तेथील लोकप्रतिनिधी जगाला असेच भासवण्याचा प्रयत्न करत आहेत की, आम्ही मंदिरांवरील आक्रमणांच्या विरोधात आहोत; मात्र प्रत्यक्षात ते हिंदूंच्या रक्षणासाठी काहीही करत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !

अनंतनागमध्ये आतंकवाद्यांकडून भाजपचे नेते आणि त्यांची पत्नी यांची हत्या !

जोपर्यंत या आतंकवाद्यांचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील अशा घटना कायमच्या थांबणार नाहीत !

देहलीतील आमदारांचे वेतन ७२ सहस्र रुपयांवरून १ लाख ७० सहस्र रुपये झाले !

सामान्य जनतेचेही वेतन इतक्या पटींनी वाढत नाही, तितके आमदारांचे आणि खासदारांचे वेतन वाढते ! आमदारांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतांनाही नंतर आयुष्यभर निवृत्ती वेतनाचा आणि अन्य सुविधांचाही लाभ मिळत असतो, हे लक्षात घ्या !

कोलकाता येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीला २ तोळ्यांचा सोन्याचा ‘मास्क’ !

कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी अन्य अनेक पर्याय उपलब्ध असतांना देवतांचा वापर कशासाठी ? धर्मप्रेमी हिंदूंनी याचा वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनी प्रथमच माकपच्या मुख्यालयामध्ये स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकवला जाणार !

गेली ७४ वर्षे माकपने राष्ट्रध्वज का फडकवला नाही, हे जनतेला सांगून याविषयी देशवासियांची क्षमा मागितली पाहिजे !

मराठा आरक्षणासंबंधीचे विधेयक लोकसभेत सादर

लोकसभेमध्ये ९ ऑगस्ट या दिवशी मराठा आरक्षणासंबंधी विधेयक मांडण्यात आले. विधेयकात ३३८ ब आणि ३४२ अ या अंतर्गत काही सुधारणा होणार आहेत. हे विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर राज्यसभेत मांडले जाणार आहे.

पोलीस ठाण्यांमध्ये मानवाधिकारांना सर्वाधिक धोका !- सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

जे सामान्य नागरिकांना अनेकदा सहन करावे लागते, तेच सरन्यायाधीशही सांगत आहेत, यातून पोलिसांची आसुरी वृत्ती पुन्हा एकदा स्पष्ट होते ! अशा जनताद्रोही पोलिसांवर वचक निर्माण करण्यासाठी सरन्यायाधिशांनीच पुढाकार घ्यावा, असेच सामान्य जनतेला वाटते !

राज्य सरकारने २ वर्षांपासून गोशाळांना अनुदान न दिल्याने विदर्भातील १९३ गोशाळा बंद पडण्याच्या मार्गावर !

कोरोना महामारीचे कारण पुढे करून ‘गोवंश सेवाकेंद्र’ योजनेंतर्गत राज्यातील ३४ जिल्हे अन् १३९ महसुली उपविभाग यांतील गोशाळांना १ रुपयाही अनुदान नाही !

संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ची चाचणी यशस्वी

संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ पुढील वर्षी भारतीय नौदलाच्या सेवेत समाविष्ट केली जाणार आहे.

अमृतसर (पंजाब) येथील गावामध्ये पाकमधून ड्रोनच्या साहाय्याने पाठवला शस्त्रसाठा !

हँड ग्रेनेड, १०० हून अधिक काडतुसे आणि ‘टिफीन बॉम्ब’ सापडला !
पाकचे ड्रोन भारतीय सीमेत घुसतातच कसे ?