भारत ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’चा १ मासासाठी बनला अध्यक्ष !

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत टी.एस्. तिरुमूर्ती

न्यूयॉर्क (अमेरिका) – भारत ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’चा एक मासासाठी अध्यक्ष बनला आहे. याविषयी पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता जाहिद हाफीज चौधरी यांनी म्हटले आहे की, भारत त्याच्या कार्यकाळामध्ये निष्पक्ष राहून योग्य निर्णय घेईल, अशी आशा आहे. तसेच भारत अध्यक्ष झाल्यामुळे आता पाकला या व्यासपिठावर जम्मू-काश्मीरचे सूत्र उपस्थित करता येणार नाही. (जे सूत्र चुकीचे आहे, ते कुठेही उपस्थित करण्यास भारताचा नेहमीच विरोध राहिला असल्याने भारताच्या अध्यक्षतेखाली तो संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत तरी ते सूत्र कसे उपस्थित होऊ देईल ? – संपादक)

१. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत टी.एस्. तिरुमूर्ती म्हणाले की, भारत सागरी संरक्षण, शांततेचे रक्षण आणि आतंकवाद रोखणे, या ३ प्रमुख गोष्टींवर प्रयत्न करेल.

२. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत १५ देश आहेत. यापैकी ५ स्थायी आणि १० अस्थायी सदस्य आहेत. स्थायी देशांमध्ये चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. भारत परिषदेचा अस्थायी सदस्य आहे. अस्थायी सदस्य म्हणून भारताला २ वर्षांचा कालावधी मिळाला आहे. १ जानेवारी २०२१ पासून या कालावधीला प्रारंभ झाला आहे.