‘जनआशीर्वाद यात्रा’ होणारच ! – राजन तेली, जिल्हाध्यक्ष, भाजप

जनआशीर्वाद यात्रेचा दौरा पूर्वनियोजित असतांना, तसेच कोणत्याही प्रकारची निवडणूक आचारसंहिता नसतांना प्रशासनाने नोटीस बजावणे नियमबाह्य आहे.

केंद्रशासनाच्या योजनेनुसार कोकण रेल्वेची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल होत असल्याचा अंदाज

‘नॅशनल मनिटायझेशन पाईपलाईन’ योजनेच्या अंतर्गत रेल्वेमार्गासह रेल्वेस्थानके आणि ‘पॅसेंजर गाड्या’ भाड्याने देऊन त्यामधून निधी उभारण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतल्याचे समजते.

निधन वार्ता

सनातनच्या  साधिका सौ. निलांबरी ओझरकर यांचे वडील मधुकर चिंधुशेठ दुसाने (वय ८७ वर्षे) यांचे २५ ऑगस्ट या दिवशी सकाळी १०.३० वाजता धुळे येथे वृद्धपकाळामुळे निधन झाले. सनातन परिवार ओझरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

शिक्षकदिनानिमित्त ग्रामीण मराठी साहित्य परिषद आणि शिवमार्ग वृत्तवाहिनी यांच्या वतीने ‘गुरुवंदना’ या ऑनलाईन काव्यस्पर्धेचे आयोजन

उत्कृष्ट ६ कवींना विशेष पारितोषिके देण्यात येणार असून सहभागी झालेल्या सर्वांना ‘डिजिटल’ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

कोरोनाच्या संसर्गामुळे समर्थभक्तांनी श्रावण मासातील उपासना स्वत:च्या घरात राहूनच करावी !

श्री दासबोध अभ्यास मंडळाचे माधरावराव गाडगीळ यांचे आवाहन

‘द एम्पायर’ या ‘वेब सिरीज’च्या प्रसारणाला आमचा तीव्र विरोध ! – आमदार राम कदम, भाजप

केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे भाजपचे नेते राम कदम यांनी पुढाकार घेऊन ही वेब सिरीज बंद पाडण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीच राष्ट्रप्रेमी हिंदूंची अपेक्षा आहे !

‘हॉटस्टार’वरून इस्लामी आक्रमक बाबरावर आधारित ‘द एम्पायर’ या वेब सिरीजचे प्रसारण !

श्रीराममंदिर उद्ध्वस्त करणार्‍या बाबराचे अश्लाघ्य उदात्तीकरण !
भारताच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा घाट !

अफगाणिस्तानमधील शरणार्थी उघूर मुसलमान भीतीच्या छायेत !

चीनच्या दबावामुळे तालिबानी आतंकवादी उघूर मुसलमानांना चीनच्या कह्यात देण्याची शक्यता

हिंदु धर्म आणि हिंदू यांवर टीका करणार्‍या अभिनेत्री स्वरा भास्कर यांचा विविध धार्मिक विधी करून गृहप्रवेश !

हिंदु धर्मावर टीका करणार्‍या आणि हिंदूंना ‘आतंकवादी’ संबोधणार्‍यांनी अशी कितीही पूजा-अर्चा केली, तरी त्यांची पापे धुतली जाणार नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे !