लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्याकडून अभिवादन !

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि अन्य

सांगली, १ ऑगस्ट (वार्ता.) – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीच्या निमित्ताने पुष्पराज चौक येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी राहुल बोळाज, शिवसेनेचे उपसरपंच भगवानदास केंगार, शिवसेना महाराष्ट्र कामगार सेनेचे सांगली शहराध्यक्ष शितल थोरवे, महाराष्ट्र कामगार सेनेचे मिरज तालुकाध्यक्ष गणेश पाटील, विजय पाटील यांसह अन्य उपस्थित होते.