धूपप्रतिबंधक बंधारा बांधावा आणि वाळूचा उपसा थांबवावा, या मागण्यांसाठी तळाशीलवासियांचे उपोषण दुसर्‍या दिवशी चालू

बंधार्‍याचे काम चालू होत नाही किंवा काम चालू करण्याविषयीचे लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार अशी चेतावणी ग्रामस्थांनी दिली आहे.

हवामान पालटामुळे पश्‍चिम घाटातील ३३ टक्के जैवविविधता वर्ष २०५० पर्यंत नष्ट होणार ! – शास्त्रज्ञांचा दावा

भौतिक विकासामुळे निसर्ग नष्ट होणार आहे, असे शास्त्रज्ञच आता सांगत आहेत. राज्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे, तसेच विज्ञानाचे गोडवे गाणार्‍यांनी वैज्ञानिक शोधांचा अनियंत्रित वापर केल्यामुळे होणार्‍या हानीविषयी कधी समाजाला सजग केले नाही.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध करण्यासाठी उपजिल्हाधिकारी संबंधित तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांकडून मागवत आहेत सूचना

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध करण्यासाठी उपजिल्हाधिकारी संबंधित तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांकडून सूचना मागवत आहेत.

दोडामार्ग तालुक्यात रस्त्यांची निकृष्ट कामे करणार्‍यांवर कारवाई व्हावी, यासाठीचे उपोषण दुसर्‍या दिवशी चालू

नवीन रस्ते खराब होणे, रस्त्याची बाजूपट्टी आणि पूल खचणे, असे प्रकार घडत आहेत. या सर्वांना कर्तव्याची जाणीव नसलेले ठेकेदार आणि विकासकामे चालू असतांना लक्ष न ठेवणारी प्रशासकीय यंत्रणा उत्तरदायी आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरेल का ?

मये गाव स्थलांतरित मालमत्तेच्या जोखडातून त्वरित मुक्त करा !

प्रशासन मयेवासियांना ‘सनद’ देण्यास विलंब लावत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गोवा शासनाचा निषेध करण्यासाठी या धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे १०१ नवीन रुग्ण आढळले

जिल्ह्यात १६ ऑगस्ट या दिवशी कोरोनाचे १०१ नवीन रुग्ण आढळले, तर एकही मृत्यू नाही. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र २९८ झाली आहे.

पहा Video : उड्डाण करणार्‍या विमानाला बाहेरून पकडून प्रवास करणारे काही अफगाणी खाली पडले !

पत्रकार अमिरी यांनी यासंबंधीचा काबुल विमानतळावरील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.

राष्ट्रध्वज उलटा फडकावल्याच्या प्रकरणी केरळमध्ये भाजप नेत्यावर गुन्हा नोंद

याविषयी भाजपचे के. सुरेंद्रन् म्हणाले की, राष्ट्रध्वज फडकावतांना अर्ध्यावर आम्हाला आमची चूक लक्षात आली आणि ती सुधारली; पण अनेक साम्यवादी कार्यकर्त्यांनी याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला.

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. सय्यद तुफैल हसन संपूर्ण राष्ट्रगीत बोलू शकले नाही !

हसन यांचे भारतावर किती प्रेम आहे, याचा शोध घ्यायला हवा; कारण खरा भारतीय अशा प्रकारे राष्ट्रगीत विसरणार नाही किंवा तो पाठ करून, कागदावर लिहून तरी आणेल !

पहा Videos : तालिबान्यांच्या भीतीमुळे लक्षावधी लोक देश सोडून जाण्याच्या सिद्धतेत !

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यापासून तेथील स्थिती बिघडत चालली आहे. लक्षावधी लोक देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. सहस्रो लोकांनी काबुल विमानतळावर धाव घेतली असून ते तेथील विमानांमध्ये बलपूर्वक घुसत आहेत.