सांडवली (जिल्हा सातारा) गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय !

अतीवृष्टीमुळे सातारा तालुक्यातील सांडवली येथे डोंगरकडा अथवा दरड कोसळण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. माळीण किंवा आंबेघर यांसारखी दुर्घटना सांडवली येथे घडू शकते. त्यामुळे हा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला आहे.

हिंदी महासागरातील तापमानवाढीमुळे भारतात पूरस्थिती निर्माण होणार ! – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

विज्ञानाने केलेल्या कथित प्रगतीमुळे पृथ्वीवरील वातावरणामध्ये विनाशकारी पालट झाला आहे, हे विज्ञानवादी कधी मान्य करणार ?

बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप

या आरोपामध्ये तथ्य असेल, तर तृणमूल काँग्रेसमध्ये राष्ट्रघातकी, समाजघातकी, भ्रष्ट यांसह बलात्कार्‍यांचाही भरणा आहे, हे पुढे येईल ! असा पक्ष लोकशाहीसाठी धोकादायक !

कराची (पाकिस्तान)येथे श्री गणपति मंदिराच्या तोडफोडीच्या विरोधात हिंदूंची निदर्शने !

भगवे झेंडे हातात धरून ‘जय श्रीराम’ आणि ‘हर हर महादेव’च्या दिल्या घोषणा !

कोडगु (कर्नाटक) येथील ‘राजीव गांधी राष्ट्रीय उद्याना’चे नाव पालटून ‘जनरल  करिअप्पा’ ठेवण्याची मागणी

वास्तविक राष्ट्रप्रेमींना अशी मागणी करावी लागू नये. सरकारने स्वतःहून अशी कृती करणे अपेक्षित आहे !

पाकमध्ये ईशनिंदेच्या प्रकरणी ८ वर्षांच्या हिंदु मुलाला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता !

पाकमध्ये अल्पसंख्य आणि त्याहून अधिक हिंदूंचा छळ करण्यासाठीच त्यांना जाणीवपूर्वक ईशनिंदेच्या गुन्ह्यामध्ये अडकवले जाते आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली जाते. याचा जागतिक समुदायाने आणि मानवाधिकार संघटनांनी विरोध केला पाहिजे !

महंत श्री किशोर पुरी महाराज यांच्या देहत्यागानंतर राजस्थानमधील काँग्रेस सरकार मेहंदीपूर बालाजी मंदिराचे सरकारीकरण करण्याच्या सिद्धतेत !

मंदिराचे व्यवस्थापन सांभाळण्यास भक्तांनीच पुढाकार घेऊन ‘मंदिरे सरकारच्या नव्हे, तर भक्तांच्याच नियंत्रणात असली पाहिजेत’, हे त्यांनी काँग्रेस सरकारला ठणकावून सांगितले पाहिजे. यासाठी धार्मिक संस्थांनीही पुढाकार घ्यायला पाहिजे !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील प्रसिद्ध श्री डासना देवी मंदिरात घुसून साधूंवर प्राणघातक आक्रमण  

उत्तरप्रदेशमध्ये गेल्या काही मासांमध्ये अनेक साधूंच्या हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यावरून पोलिसांची निष्क्रीयता समोर येत आहे. याकडे राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लक्ष देऊन साधूंचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !

कथित धर्मविरोधी घोषणाबाजी केल्याच्या प्रकरणात भाजपचे नेते अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय यांच्यासह ६ जणांना अटक

जंतर मंतर परिसरात ८ ऑगस्ट या दिवशी देशातील इंग्रजांच्या काळातील कायदे रहित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत जोडो आंदोलना’च्या वेळी एका विशिष्ट धर्माच्या विरोधात कथित चिथावणीखोर घोषणा दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ६ जणांना अटक केली.

सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या स्थानांतराच्या विरोधात सरपंच संघटनेचे आंदोलन

सर्वसामान्य जनतेला प्रशासनाचा वाईटच अनुभव येतो.