(म्हणे) ‘ओणम् सणाच्या वेळी गर्दी करू नका !’  

  • केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांचा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरून राज्यातील हिंदूंना फुकाचा सल्ला !  
  • केरळमध्ये मुसलमानांना चुचकारण्यासाठी तेथील साम्यवादी सरकारने बकरी ईदच्या काळात कोरोना नियमांत सूट दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढली. आता हिंदूंच्या सणांच्या वेळी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी हा सल्ला देणे म्हणजे साम्यवादी सरकारला सुचलेला हा शहाणपणा म्हणायचा कि हिंदुद्वेष ?
वीणा जॉर्ज यांचा हिंदूंना फुकाचा सल्ला

थिरूवनंतपूरम् (केरळ) – ओणम् सणाच्या वेळी गर्दी करू नका, कार्यक्रमांचे आयोजन करू नका. शक्य होत असेल, तर नातेवाइकांना भेटणे टाळा, विशेषतः लहान मुलांना भेटणे टाळा, असा फुकाचा सल्ला केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी राज्यातील हिंदूंना कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर दिला आहे.

वीणा जॉर्ज म्हणाल्या की, केरळ राज्य अद्याप कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतून मुक्त झालेले नाही, अशा वेळी लोकांनी संसर्ग वाढू नये आणि तिसर्‍या लाटेपासून रक्षण होण्यासाठी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. (केरळ राज्य कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतून मुक्त झाले नसल्याचे वीणा जॉर्ज यांना ईदच्या वेळी आठवले नाही का ? – संपादक)