(म्हणे) ‘१४ ऑगस्टपर्यंत जिहाद्यांची सुटका न केल्यास परिणामांना सिद्ध रहा !’

अशी पत्रे कधी मशिदी किंवा चर्च यांना पाठवली जात नाहीत; कारण ‘आतंकवाद्यांना धर्म असतो’ आणि ते हिंदूंना लक्ष्य करतात !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील अनेक मोठी मंदिरे आणि रा.स्व. संघ यांचे कार्यालय यांना धमकीची पत्रे मिळाली आहेत. यात ‘१४ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत जिहाद्यांची सुटका केली नाही, तर त्याचे परिणाम भोगण्यास सिद्ध रहा’, अशी धमकी देण्यात आली आहे. ही पत्रे ‘रजिस्टर्ड’ टपालाद्वारे पाठवण्यात आली आहेत. ही पत्रे मिळाल्यानंतर मंदिरांच्या व्यवस्थापनांनी पोलिसांत कळवल्यावर चौकशी चालू करण्यात आली आहे; मात्र पोलीस याविषयी माहिती देण्यास नकार देत आहेत.