कोईंबतूर (तमिळनाडू) येथे हिंदूंची मंदिरे पाडल्याच्या विरोधात हिंदु मक्कल कत्छी संघटनेचे आंदोलन

अध्यक्ष अर्जुन संपथ यांना अटक

नास्तिकतावादी द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रमुक) सरकारच्या काळात हिंदूंच्या मंदिरांवर असे आघात होणार आणि हिंदूंच्या संघटनांवर अन् कार्यकर्त्यांवर कारवाई होणार, यांत आश्‍चर्य ते काय ! अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

हिंंदु मक्कल कत्छीचे अध्यक्ष अर्जुन संपथ (गाडीत मध्यभागी)

कोईंबतूर (तमिळनाडू) – येथील मुथन्ननकुलम् तलावाच्या किनारी असणारी मंदिरे पालिकेने सुशोभीकरणासाठी पाडल्याच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून आंदोलन चालू आहे. नुकतेच हिंंदु मक्कल कत्छीचे (हिंदु जनता पक्षाचे) अध्यक्ष अर्जुन संपथ यांना पालिका आणि तमिळनाडू सरकार यांच्याविरोधात आंदोलन केल्यावरून अटक करण्यात आली. या तलावाच्या किनारी ते आणि त्यांचे कार्यकर्ते शांततेत आंदोलन करत असतांना त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या संघटनेने मंदिरांची पुनर्उभारणी करण्याची मागणी केली आहे.