लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याची केसरीवाड्यात स्थापना

लोकमान्य टिळक यांचा पूर्णाकृती पुतळा

पुणे – केसरीवाड्यात लोकमान्य टिळक यांच्या निवासस्थानी २३ जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा आणि लोकमान्य टिळक जयंती यांचे औचित्य साधून त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली. मुंबईतील सरदार भवन येथे १९१९ या वर्षी लोकमान्य टिळकांना खुर्चीत बसवून त्यांच्यासमोरच मूर्तीकार कै. केशव बाबूराव लेले यांनी स्वत:च्या वयाच्या १८ व्या वर्षी हा पुतळा सिद्ध केला होता. ‘लोकमान्य टिळकांच्या निवासस्थानी हा पुतळा जतन करण्यात यावा’, अशी लेले कुटुंबियांची इच्छा होती. त्यानुसार या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे.

या पुतळ्याचे विशेष महत्त्व आहे. लेले कुटुंबियांनी इतकी वर्षे हा पुतळा जपला. त्यांच्या वतीने आज तो टिळकांच्या निवासस्थानी बसवण्यात आला. हा पुतळा म्हणजे पुणे शहराची शान आहे, अशी प्रतिक्रिया आमदार मुक्त टिळक यांनी या वेळी दिली.