चीनची लडाखमध्ये पुन्हा घुसखोरी

आक्रमक न रहाण्याच्या भारताच्या भूमिकेचा चीन अपलाभ घेत असून तो अशा प्रकारची घुसखोरी करत आहे. यावरून भारत जेव्हा चीनला जशास तसे उत्तर देईल, तेव्हाच या घटना थांबतील !

नवी देहली – चीनने पुन्हा एकदा भारतीय सीमेमध्ये घुसखोरी केल्याची घटना समोर आली आहे. पूर्व लडाखमधील डेमचोक येथील चार्डींग नाल्याच्या बाजूला भारताच्या सीमेमध्ये चीनने तंबू उभारले आहेत, अशी माहिती वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांनी दिली. ‘तंबूत रहाणारे लोक हे चिनी नागरिक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना परत जाण्यास सांगितले असले, तरी अद्याप ते तिथेच आहेत’, असे अधिकार्‍यांनी सांगितले. (ते चिनी नागरिक नसून चीनचे सैनिकच असणार, यात शंका नाही ! – संपादक)