‘सीईटी’ची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच अकरावीची प्रवेशप्रक्रिया चालू ! – दिनकर टेमकर, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – अकरावीच्या प्रवेशासाठी असलेली ‘सामाईक प्रवेश परिक्षा’ (सीईटी) दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येतील. या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतरच उर्वरित जागांवर दहावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील. त्यामुळे ‘सीईटी’ची कार्यवाही पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणत्याही महाविद्यालयांना अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया चालू करता येणार नाही, असे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

२१ ऑगस्ट या दिवशी घेण्यात येणार्‍या सीईटी परीक्षेच्या अर्ज नोंदणीमध्ये तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे ती प्रक्रिया ३ दिवसांपासून ठप्प आहे. अकरावी प्रवेशाच्या संदर्भात विद्यार्थी-पालकांचा वाढत असलेला संभ्रम दूर व्हावा, याकरिता शिक्षण विभागाने परिपत्रक काढून हे आदेश दिले.