कोल्हापूर जिल्ह्यातील १०९ गावांचा वीजपुरवठा खंडित

कोल्हापूर – कोल्हापुरात आलेल्या पुराने जिल्ह्यातील १०९ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, ५६ गावांचा वीजपुरवठा अंशत: खंडित झाला आहे. जिल्ह्यातील एकूण १ लाख १५ सहस्र २५४ वीजग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीजेअभावी ग्रामीण भागात नागरिकांचे हाल होत असून वीज पुरवठा बंद असल्याने पाणीपुरवठा नाही, भ्रमणभाष भारीत करण्यासाठी यंत्रणा नाही यांसह अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पन्हाळगडावरील पावनगडाचा बुरूज कोसळला; कोणतीही जीवितहानी नाही

कोल्हापूर – येथे गत ४ दिवसांपासून झालेल्या अतीवृष्टीमुळे महापुराने थैमान घातले आहे. पावसामुळे पन्हाळगडावरील पावनगडाचा बुरुज कोसळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या परिसरात  अतीवृष्टी झाली आहे. पन्हाळा येथील तहसीलदार, नगराध्यक्ष आणि पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांनी या परिसराला भेट देऊन संपूर्ण परिसराची पहाणी केली आहे.