कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे त्यागपत्र

बी.एस्. येडियुरप्पा

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र राज्यपालांकडे दिले आहे. २६ जुलै या दिवशी त्यांच्या सरकारला २ वर्षे पूर्ण झाली. त्याच दिवशी त्यांनी हे त्यागपत्र दिले आहे. राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून अद्याप कुणाच्याही नावाची घोषणा भाजपकडून करण्यात आलेली नाही.

त्यागपत्र दिल्यावर येडियुरप्पा म्हणाले की, त्यागपत्र देण्यासाठी कुणीही माझ्यावर दबाव आणला नाही. मी स्वत:हून त्यागपत्र दिले. सरकारला २ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कुणीतरी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारू शकेल. पुढील निवडणुकीत मी भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी काम करीन.