तमिळनाडूमध्ये अज्ञातांकडून पंच लिंगेश्‍वर मंदिरातील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड !

सरकारीकरण झालेल्या मंदिरांवर गेल्या काही मासांतील ही तिसरी आक्रमणाची घटना !

  • हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर काय होते, हे लक्षात घेऊन याचा विरोध करा !
  • नास्तिकतावादी द्रविड मुन्नेत्र कळघम् सरकारच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुरक्षितच रहाणार, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
डावीकडून  मूर्तीवरील जाळण्यात आलेले कपडे

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

चेन्नई (तमिळनाडू) – राज्यातील राणीपेट येथील कोंडापूरम् गावात असलेल्या पंच लिंगेश्‍वर मंदिरामधील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली, तसेच मूर्तीवरील कपडे जाळण्यात आले. अज्ञातांनी येथे हस्तमैथुन करत मूर्तीवर वीर्य पाडले. अशा प्रकारे अत्यंत अश्‍लाघ्य प्रकार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याविरोधात स्थानिक हिंदूंमध्ये संताप असून त्यांनी पोलिसांकडे आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. या मंदिराच्या शेजारी रहाणार्‍या काही धर्मांतरितांकडून हे कृत्य करण्यात आल्याचा संशय हिंदूंनी व्यक्त केला आहे. या मंदिराचे सरकारीकरण झालेले आहे. गेल्या काही मासांतील राज्यातील हिंदूंच्या मंदिरांत तोडफोड होण्याची ही तिसरी घटना आहे. ‘या मंदिरावर यापूर्वी आक्रमणे झाल्यावरही पोलिसांनी सुरक्षेसाठी प्रयत्न केला नाही’, असा आरोप हिंदू मुन्नानी (हिंदू आघाडीवर) आणि विश्‍व हिंदु परिषद या संघटनांनी केला आहे.