पाकमध्ये चिनी अभियांत्रिक आणि कामगार यांच्या बसवरील आक्रमणात १० ठार

६ चिनी नागरिकांचा समावेश  
चीनने पाकमधील आतंकवादाला प्रोत्साहन दिले. त्याचे परिणाम त्याला भोगावे लागत आहेत. या घटनेनंतर तरी चीन शहाणा होईल का, ते पहावे लागेल !

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश शासन यांना नोटीस

कोरोनाकाळात कावड यात्रेला अनुमती का ?

पुलवामा येथे ३ आतंकवादी ठार

काश्मीरमध्ये सातत्याने सुरक्षादलांकडून आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी तेथील आतंकवाद संपुष्टात आलेला नाही. जोपर्यंत आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत नवनवीन आतंकवादी निर्माण होतच रहाणार !

कोरोनाच्या ‘डेल्टा’ प्रकाराचा जगातील १०४ देशांत फैलाव ! – जागतिक आरोग्य संघटना  

कोरोनाच्या ‘डेल्टा’ प्रकाराचा जगातील जवळपास १०४ देशांमध्ये फैलाव झाला आहे आणि तो संपूर्ण जगात पसरू शकतो. कोरोनाचा हा प्रकार जगातील सर्वांत प्रबळ विषाणू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. ट्रेडोस घेब्रेसस यांनी दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना अग्नीशमनदलाच्या जवानांनी पावसात भिजून दिली मानवंदना !

मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी १२ जुलै या दिवशी अग्नीशमनदलाच्या मुख्यालयाला भेट दिली. या वेळी अग्नीशमनदलाच्या ६४ पोलिसांच्या तुकडीने भरपावसात भिजून त्यांना मानवंदना दिली.

कोरोना महामारीशी निगडित सेवेतील तणावामुळे आधुनिक वैद्यांच्या आरोग्यावर परिणाम !

३ आधुनिक वैद्य हृदयरोगामुळे रुग्णाईत !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार चालूच

आचरा येथे पूरस्थितीची पहाणी करण्यासाठी आलेल्या अधिकार्‍यांना ग्रामस्थांचा घेराव

ईदच्या निमित्ताने गोवंशियांची ‘कुर्बानी’ देण्यासाठी सरकार सर्वतोपरी साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ईदला गोवंशियांची हत्या हे गोमातेचे स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘गोवा’ या राज्याला लज्जास्पद !

सावंतवाडी शहरातील एका खासगी ‘कोविड केअर सेंटर’ने व्हेंटिलेटरची सुविधा नसतांनाही रुग्णाला त्याचे शुल्क आकारले !

मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार !

गोव्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी परिसर जलमय : राज्यात एकूण ५३ इंच पावसाची नोंद

पणजी शहरातील सखल भाग आणि रस्ते पाण्याखाली