पुलवामा येथे ३ आतंकवादी ठार

लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा समावेश

काश्मीरमध्ये सातत्याने सुरक्षादलांकडून आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी तेथील आतंकवाद संपुष्टात आलेला नाही. जोपर्यंत आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत नवनवीन आतंकवादी निर्माण होतच रहाणार ! त्यामुळे पाक नावाच्या भस्मासुराला नष्ट करा !

पुलवामा (जम्मू काश्मीर) – सुरक्षादलांनी येथे चकमकीमध्ये ३ आतंकवाद्यांना ठार केले. यांत लष्कर-ए-तोयबाच्या एजाज उपाख्य अबु हुरैरा या कमांडरचा समावेश आहे. अन्य २ स्थानिक आतंकवादी आहेत. या आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला. या चकमकीनंतर येथे संचारबंदी लावण्यात आली आहे.