कोरोनाच्या ‘डेल्टा’ प्रकाराचा जगातील १०४ देशांत फैलाव ! – जागतिक आरोग्य संघटना  

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – कोरोनाच्या ‘डेल्टा’ प्रकाराचा जगातील जवळपास १०४ देशांमध्ये फैलाव झाला आहे आणि तो संपूर्ण जगात पसरू शकतो. कोरोनाचा हा प्रकार जगातील सर्वांत प्रबळ विषाणू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. ट्रेडोस घेब्रेसस यांनी दिली आहे. कोरोनाच्या या प्रकरामुळे मृत्यू आणि संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ‘डेल्टा’ प्रकार पहिल्यांदा भारतात सापडला होता.