हासन (कर्नाटक) येथे रेव्ह पार्टीवर घातलेल्या धाडीत महिला पोलीस शिपायाला अटक !

ज्यांनी कायद्याचे रक्षण करावे, तेच कायद्याचे उल्लंघन करत असतील, तर कायदा आणि सुव्यवस्था कशी राहील? अशांना बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

कायद्याचे शिक्षण घेतांनाच अधिवक्त्यांमध्ये भेदभाव करण्यात येतो ! – न्या. चंद्रचूड यांचे निरीक्षण

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड ‘शिक्षण आणि नोकरी येथे समाजातील घटकांवर होणार्‍या भेदभावाचे निर्मूलन’ या विषयावर आयोजित एका ऑनलाईन परिषदेत बोलत होते.

कुंभमेळा आणि मरकज यांची तुलना होऊ शकत नाही ! – आचार्य महामंडलेश्‍वर श्री रामकृष्णानंद महाराज

कुंभमेळा आणि मरकज यांची तुलना होऊ शकत नाही. हिंदूंच्या कुंभमेळ्याला धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) प्रसारमाध्यमे आणि साम्यवादी विरोध करत आहेत, हे चुकीचे आहे, असे प्रतिपादन श्री पंच अग्नि आखाड्याचे महामंत्री आचार्य महामंडलेश्‍वर श्री रामकृष्णानंद महाराज यांनी केले.

पहुर (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधाचा बालिकेवर लैंगिक अत्याचार !

कोरोनाने देशात थैमान घातले असतांना आपत्काळातही वासनांध धर्मांधांची वृत्ती पालटत नाही, हे लक्षात घ्या !

सद्गुरु स्वातीताईंसारखे ‘समष्टी संत’ बनायचे ध्येय ठेवून तळमळीने साधना करणारी आणि परापर गुरु डॉक्टरांंप्रती भाव असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. चैत्राली कुलकर्णी (वय १४ वर्षे) !

कु. चैत्राली प्रतिदिन परात्पर गुरु डॉक्टरांची दर्शनपुस्तिका पहाते. ती सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाते. गुरुदेवांजवळ जाण्याची तिला पुष्कळ ओढ लागली आहे

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) येथे कोरोना रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू !

ब्रह्मपुरी शहरातील ख्रिस्तानंद रुग्णालयात असलेल्या प्रवासी निवार्‍यात उपचाराविनाच एका कोरोनाबाधिताचा तडफडून मृत्यू झाला. मृतक नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील आंबोरा येथील असून तेथील आधुनिक वैद्यांनी त्याला ब्रह्मपुरी येथे पाठवले होते.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !

रेमडेसिविर इंजेक्शनसाठी अधिक पैसे देण्यास नकार देणार्‍यास औषध दुकान चालकासह इतरांची मारहाण !

समाज पैशासाठी कोणत्या स्तराला जात आहे, याचे उदाहरण ! रेमडेसिविर इंजेक्शनची अवैध विक्री करणार्‍यांना त्वरित कठोर शिक्षा न झाल्याचा परिणाम !

गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘कीर्तनविश्‍व’या नावाच्या ‘यू ट्यूब’ चॅनलचा प्रारंभ !

या ‘यू ट्यूब चॅनेल’वर ‘नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, रामदासी कीर्तन, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, दासगणू महाराज, दत्त संप्रदायाची कीर्तन, असे नानाविध कीर्तनप्रकार ऐकायला मिळणार आहेत. कीर्तनकारांची मुलाखत हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण आहे.

अंतर्गत युद्ध केव्हा जिंकणार ?

कोरोनाशी लढण्यासाठी सूक्ष्मस्तरावर प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे साधना केली पाहिजे. हिंदु धर्मांत असे अनेक यज्ञ, होमहवन आणि मंत्र आहेत, ज्यांमुळे सूक्ष्म विषाणूंचा नाश होतो. त्याचे आयोजन करण्यासह पालन केले पाहिजे.