थकवा असतांना मानसरित्या देवद आश्रमात गेल्यावर परात्पर गुरु पांडे महाराज यांची भेट होणे आणि त्यांनी सांगितलेले उपाय केल्यामुळे अंगात शक्ती जाणवणे

ऑगस्ट मासात मला ८ – १० दिवस शारीरिक त्रासामुळे पुष्कळ थकवा जाणवत होता. १५.८.२०२० या दिवशी सकाळी नामजप झाल्यानंतर मी मानसरित्या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात गेले. तेव्हा आश्रमातील बाहेरील बाजूस मला ४ – ५ मोर दिसले.

मधुर आवाज अन् सूक्ष्मातील कळण्याची क्षमता असणार्‍या आणि संत आजी-आजोबांची सेवा भावपूर्ण करून त्यांचे मन जिंकणार्‍या सौ. सायली सिद्धेश करंदीकर !

‘सौ. सायलीला लहानपणापासून गायनाची फार आवड आहे. तिला रिकामा वेळ मिळाला की, ती गाण्याचा सराव करते. काही दिवसांपूर्वी तिने संत जनाबाईंचा एक अभंग फार अप्रतिम गायला होता.

गुरुलीला सत्संगात तुम्हीच आहात ना परम पूज्य ।

पुणे जिल्ह्यात प्रतिदिन सकाळी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक ‘गुरुलीला सत्संग’ घेतात. या सत्संगाविषयी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. स्नेहल गुब्याड यांना सुचलेली कविता पुढे दिली आहे.

भावरूपी देव माझ्या अंतरात सत्वर यावा !

देवा, आला हा अज्ञानी जीव तव द्वारी । घेऊनी चरणी कृपा कर या जिवावरी ॥

आनंदी आणि सतत कृतज्ञताभावात असणारे श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांच्यामुळे ‘स्वतःवर साधनेचे संस्कार कसे होत आहेत’, हे सांगणारी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची त्यांची कन्या कु. प्रार्थना !

‘धान्य निवडणारे साधक कष्ट करून धान्य निवडतात, स्वयंपाकघरातील साधक कष्ट करून महाप्रसाद बनवतात. त्यामुळे आपल्याला दैवी महाप्रसाद मिळतो. सगळ्या साधकांकडून शिकायचे. त्यांच्याशी आदराने बोलायचे’, असे सांगून ते माझ्यावर चांगले संस्कार करत असतात.

‘शेवटच्या श्‍वासापर्यंत गुरुदेवांची सेवा व्हावी’, या ध्यासाने सेवारत असलेल्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका श्रीमती सौदामिनी कैमल (वय ७८ वर्षे) !

श्रीमती सौदामिनी माधवन् कैमल या सनातनचे पूर्णवेळ साधना करणारे साधक श्री. नंदकुमार कैमल यांच्या आई आहेत. कोची येथील सेवाकेंद्रात रहाणार्‍या साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट पुढे दिले आहेत.

सध्याची समाजस्थिती डोळे झाकून आंधळ्याच्या मागेच जाणे

आजचा समाज ‘अन्धेनैव नीयमाना यथान्धाः ।’ म्हणजे ‘एका अंधाने नेलेल्या दुसर्‍या अंध माणसाप्रमाणे डोळे झाकून आंधळ्याच्या मागेच चालला असून त्यातच ‘आपण धन्य झालो आहोत’, असे समजतो.’