कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेमुळे भारतात आणि विशेषकरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परत एकदा नागरिकांना विविध स्वरूपाच्या कठीण संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे अक्षरशः हाल होत आहेत. याला प्रशासन आणि नागरिक यांच्या चुका, भ्रष्टाचार, भोंगळ कारभार, नियोजनाचा अभाव यांमुळे विलंबाने अन् अपुर्या प्रमाणात मिळणारे वैद्यकीय उपचार, औषधांचा तुटवडा, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मिळणारी अयोग्य वागणूक आदी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आता आपत्काळाची दाहक झळ बसत आहे. या महामारीच्या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत. यातून वाचकांनाही आपत्काळाची भीषणता लक्षात येऊन काय सावधानता बाळगायला हवी, हे लक्षात येईल.
‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
|
इतका भयानक प्रकार घडणे हे आरोग्य क्षेत्रासाठी लाजिरवाणे आणि तितकेच धक्कादायक आहे. ‘कर्मचार्याने गुन्हा मान्य करणे आणि शल्यचिकित्सकांनी त्याला बगल देणे यातूनच या प्रकरणात नक्कीच पाणी मुरत असणार’, असे जनतेला वाटल्यास चूक काय ?
संभाजीनगर – मिनी घाटीतील (चिकलठाणा जिल्हा रुग्णालय) चतुर्थ श्रेणी कर्मचारी अनिल ओमप्रकाश बोहते याला काळ्या बाजारात रेमडेसिवीर इंजेक्शन विकतांना पुंडलिकनगर पोलिसांनी पकडले होते. रुग्णालयातील परिचारिकेने जाणीवपूर्वक इंजेक्शन कचर्यात टाकल्यानंतर तेथून तो इंजेक्शन घेऊन त्याची विक्री करायचा, असा जबाब त्याने दिला आहे. त्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी ‘इंजेक्शन चोरीस गेलेच नाहीत’, असा दावा केला आहे; मात्र पोलीस रुग्णालयातील परिचारिका, वॉर्ड इन्चार्ज, स्टोअर कीपर यांसह इतरांची चौकशी करणार आहेत. आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनीही ३ सदस्यांची एक स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त केली असून १५ दिवसांत अहवाल मागितला आहे.
१६ एप्रिलच्या पहाटे पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि त्यांचे पथक यांनी सापळा रचून बोहते अन् त्याच्याकडून इंजेक्शन घेणारे शिवाजीनगर येथील मयूरेश्वर मेडिकलचे चालक मंदार भालेराव, सूतगिरणी चौकातील इंद्रा मेडिकलचे मालक अभिजित तौर यांना अटक केली होती. एक इंजेक्शन ९ सहस्र रुपयांना खरेदी करून ते वाढीव दराने बीडसह इतर ठिकाणी विकले जात होते. बोहते मिनी घाटी रुग्णालयाचा कर्मचारी असल्याने तो तेथूनच इंजेक्शन चोरत असणार, असा पोलिसांचा संशय होता.
पोलिसांनी घाटी रुग्णालय प्रशासनाला पत्र पाठवून विविध प्रश्न विचारले !
पोलिसांनी मिनी घाटी रुग्णालयाच्या प्रशासनाला पत्राद्वारे पुढील प्रश्न विचारले आहेत. सरकारी कोट्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचे दायित्व कुणाचे आहे ? इंजेक्शनच्या वाटप किंवा देखभालीसाठी स्टोअर कीपर किंवा तत्सम अधिकार्याची नेमणूक केली आहे का ? असेल, तर ती कुणाची ? इंजेक्शन ज्या प्रभागामध्ये वापरले जाते किंवा हस्तगत झालेले इंजेक्शन ज्या प्रभागासाठी दिले गेले, त्या प्रभागाचा प्रमुख कोण ?
रुग्णाचा मृत्यू झाल्यास ते इंजेक्शन काळ्या बाजारात जाण्याची शक्यता !
आधुनिक वैद्यांच्या उपदेशानुसार परिचारिका इंजेक्शनची मागणी स्टोअरकडे करतात. ती मान्य झाल्यावर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांची स्वाक्षरी असलेला अर्ज स्टोअर कीपरकडे दिला जातो आणि इंजेक्शन मिळते. ते वॉर्ड इन्चार्ज परिचारिकेद्वारे रुग्णाला दिले जाते. या काळात रुग्णाचा मृत्यू झाल्यास ते इंजेक्शन दुसर्या रुग्णाला देणे अपेक्षित आहे; पण त्यावर बारिक लक्ष ठेवणारी आणि पडताळणारी यंत्रणा नाही. याचाच अपलाभ घेऊन इंजेक्शन काळ्या बाजारात विकले जात असावेत, अशी शक्यता आहे.
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि विज्ञापनदाते यांनी त्यांना किंवा परिचितांना येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत. आरोग्य साहाय्य समितीपत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : [email protected] |