बरेली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर सहस्रावधी मुसलमानांकडून महंत यति नरसिंहानंद यांचा शिरच्छेद करण्याची मागणी !

राज्यातील डासना देवी मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केले होते.

देशात सर्वाधिक लसपुरवठा महाराष्ट्राला ! – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

देशात सर्वाधिक लसीचे डोस महाराष्ट्राला दिले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या ३ राज्यांना १ कोटींपेक्षा अधिक लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत.

म्हैसुरू (कर्नाटक) येथे ग्रंथालयाला लावण्यात आलेल्या आगीमध्ये गीतेच्या ३ सहस्र प्रती जळल्या

म्हैसुरू येथे समाजकंटकांनी एका ग्रंथालयाला लावलेल्या आगीत श्रीमद्भगवद्गीतेच्या ३ सहस्र, तर कुराण आणि बायबल यांच्या १ सहस्र प्रती नष्ट झाल्या.

पोलीसदलाची प्रतिमा डागाळणार्‍या भ्रष्ट वृत्तीच्या अधिकार्‍यांचा बंदोबस्त करण्याला प्राधान्य देणार ! – संजय पांडे, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य

सचिन वाझे यांच्या प्रकरणानंतर गृहविभागाने परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे हेमंत नगराळे यांची नियुक्ती केली.

पाकमध्ये ख्रिस्ती परिचारिकांना ईशनिंदेच्या प्रकरणी अटक

लाहोर येथे २ ख्रिस्ती परिचारिकांवर ईशनिंदेच्या आरोपावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रुग्णालयाच्या भिंतीवर लावण्यात आलेला एक पवित्र स्टिकर हटवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे राष्ट्र अन् धर्म यांविषयी समाजामध्ये जागृती करण्याचे कार्य कौतुकास्पद ! – पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज

छत्तीसगड (रायपूर) येथील शदाणी दरबार तीर्थचे नववे पिठाधिश पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज हे विश्‍व हिंदु परिषदेच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आणि विश्‍व हिंदु परिषदेच्या उच्च अधिकार समितीचे सदस्य आहेत.

१८ वर्षांवरील व्यक्ती कोणताही धर्म स्वीकारू शकते ! – सर्वोच्च न्यायालय

जादूटोणा, अंधश्रद्धा, आमीष आणि आर्थिक लाभ यांच्या आधारे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी आदेश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने याचिकाकर्ते अधिवक्ता अश्‍विनीकुमार उपाध्याय यांना केंद्र सरकारकडे म्हणणे मांडण्यास सांगितले.

हिदूंनो, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा आदर्श घ्या !

या श्‍लोकाप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व शिवपाईक धारकरी दैनंदिन जीवनात जगतात, तसेच देव, देश आणि धर्म यांचे कार्य करतात. फाल्गुन शुक्ल पक्ष प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या हा कालावधी महाराष्ट्र्रातील प्रत्येक धारकरी, शिवपाईक हे धर्मवीर बलीदान मास म्हणून पाळतात.

ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण आणि उत्खनन करण्यास न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार !

काशी विश्‍वनाथ मंदिरासमोरील ज्ञानवापी मशिदीचे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण आणि उत्खनन करण्यास वाराणसी जलदगती न्यायालयाने अनुमती दिली. त्यानंतर मुसलमानांच्या संघटना आणि नेते यांच्याकडून प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.

श्रीलंकेच्या नवीन घटनेत हिंदु धर्मालाही बौद्ध धर्माएवढेच स्थान देण्याची शिवसेनाई संघटनेची मागणी !

श्रीलंकेतील शिवसेनाई या हिंदूंच्या हक्कांसाठी लढणार्‍या संघटनेने देशाच्या नव्या राज्यघटनेत काही तरतुदी करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार हिंदु धर्माला बौद्ध धर्माएवढेच स्थान देण्यात यावे, तसेच घटनेत जे प्राधान्य बौद्ध धर्माला आहे, ते हिंदु धर्मालाही द्यावे, अशी मागणी केली आहे.