बरेली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर सहस्रावधी मुसलमानांकडून महंत यति नरसिंहानंद यांचा शिरच्छेद करण्याची मागणी !

पैगंबर यांचा कथित अवमान केल्याचे प्रकरण

  • देशात न्याययंत्रणा असतांना अशा प्रकारची मागणी कशी केली जाते आणि पोलीस त्यांच्या विरोधात गुन्हा का नोंदवत नाहीत ? उद्या प्रत्येकाने अशा प्रकारची मागणी केली, तर समाजात कायदा आणि सुव्यवस्था राहील का ?
  • हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची नग्न चित्रे काढल्यावर हिंदूंनी कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी प्रयत्न केला. तरीही हिंदूंना निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी ‘असहिष्णु’ ठरवतात !

बरेली (उत्तरप्रदेश) – राज्यातील डासना देवी मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांनतर  बरेली येथे ९ एप्रिल या दिवशी शुक्रवारच्या नमाजानंतर सहस्रावधी मुसलमानांनी यति नरसिंहानंद यांचा शिरच्छेद करण्याची मागणी केली.