सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना लसीकरण नियमितपणे चालू : महापालिकेला ५ सहस्र लसी प्राप्त

शासनाकडून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला ९ एप्रिलला रात्री उशिरा ५ सहस्र लसी प्राप्त झाल्या असून महापालिका क्षेत्रातील २९ केंद्रांवर कोरोना लसीकरण नियमितपणे चालू करण्यात आले आहे. महापालिकेची १६ आणि १३ खासगी रुग्णालये येथे हे लसीकरण करण्यात येत आहे.

चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेमध्ये कोरोनापेक्षाही धोकादायक विषाणू

तांदूळ आणि कापूस यांच्या जेनेटिक डाटाच्या आधारे वैज्ञानिकांचा दावा

राज्य सरकारकडून कोरोनाशी संबंधित चाचण्यांच्या दरात कपात !

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच कोरोनाशी संबंधित चाचण्यांच्या दरात कपात केली आहे. आर्.टी.पी.सी.आर्. आणि रॅपिड अँटीजेन चाचणीसाठी अनुक्रमे ५०० रुपये आणि १५० रुपये असा दर निश्‍चित केला आहे

पुण्यात १४४ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग

शहर पोलीस दलातील १४४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी काही पोलीस रुग्णालयात, तर काही जण गृह विलगीकरणात आहेत. पोलीसदलात आतापर्यंत १ सहस्र ७०० जणांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे.

बंगालमधील अराजक !

पोलीस अधिकार्‍याच्या संदर्भात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ज्या गावातील चोराच्या घरी ते धाड टाकण्यास गेले होते, त्यांच्यावर तेथील स्थानिकांनी आक्रमण करत त्यांच्यावर दगडफेक केली आणि त्यांना मरेपर्यंत मारहाण केली. त्यांना रुग्णालयात नेल्यावर मृत घोषित करण्यात आले.

देवता, संत आणि संस्कृती यांची विटंबना रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा आवश्यक ! – स्वामी कमेश्‍वरपुरी

या कायद्याविषयी सामाजिक माध्यमातील ‘फेसबूक’वरून थेट कार्यक्रम घेऊ शकतो. यासाठी माझे सभागृह तुम्हाला उपलब्ध करून देईन, तसेच धर्मकार्यासाठी जे साहाय्य हवे आहे, ते करण्यासाठी मी सदैव सिद्ध आहे.

कोरोना महामारीची तीव्रता लक्षात घेऊन स्वत:सह कुटुंबियांचे रक्षण होण्यासाठी ‘कोरोना’विषयक सूचनांचे साधना म्हणून पालन करा !

जन्म-मृत्यू हे प्रारब्धानुसार निर्धारित असतात, तसेच संत आणि भविष्यवेत्ते यांनी वर्तवलेल्या भाकितानुसार आपत्काळात विविध आपत्तींमध्ये मोठी मनुष्यहानी होणार आहे. असे असले, तरी आपले योग्य क्रियमाण वापरणे हे ईश्‍वराला अपेक्षित आहे. आपत्तीविषयी वेळोवळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे ही साधना आहे.

खाटा आणि रेमडेसिविर लसीच्या व्यवस्थापनात समन्वय ठेवा ! – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

‘रेमडेसिविर’चा लसीचा काळाबाजार होण्यापूर्वीच प्रशासनाने लसीचे योग्य प्रकारे नियोजन करून ते रुग्णांना देणे आवश्यक होते. आता काळाबाजार झाल्यानंतर असे निर्देश देऊन काय उपयोग ?

स्वधर्माच्या रक्षणासाठी स्वतः उभे ठाका ! – उमा आनंदन, उपाध्यक्ष, टेम्पल वर्शिप सोसायटी, फ्री टेम्पल मुव्हमेंट, तमिळनाडू

श्री चिदंबरम् मंदिर हिंदूंच्या कह्यात येण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयावर ३ वेळा सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करावी लागली. या मंदिरातील पैसा आजही निधर्मी सरकारवर खर्च होतो. या मंदिरातून ६ सहस्र कोटी रुपये निधी जमा होतो; पण येथील पुजार्‍यांना तुटपुंजे वेतन दिले जाते.

परिस्थिती चिंताजनक असल्याने उपचार निवडीच्या पर्यायात वेळ दवडू नका ! – सौ. किशोरी पेडणेकर

या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘ रेल्वेचे २ सहस्र ८०० बेड्स सिद्ध आहेत. वरळी येथे ‘एन्.आय्.सी.ए.’मध्ये खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कांजूरमार्ग येथे अडीच सहस्रपर्यंत खाटा सिद्ध करत आहोत.