राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारविरोधात व्यक्त केला असंतोष !

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच राज्याची कोरोनाविषयक स्थिती यांविषयी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांशी चर्चा केली.

रश्मी शुक्ला भाजपच्या दलाल असून त्यांनी अनुमतीविना फोन ‘टॅप’केले ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांक विकासमंत्री

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत गुप्तचर विभागाच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलिसांच्या स्थानांतरामध्ये रॅकेट असल्याची माहिती पोलीस महासंचालकांद्वारे मुख्यमंत्र्यांना दिली होती…..

उरण येथील शिवसेनेचे आमदार मनोहरशेठ भोईर यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सदिच्छा भेट !

शिवसेनेच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी कार्यरत असणारे आमदार श्री. मनोहरशेठ भोईर यांची रायगड जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड झाली आहे.

मद्यपान करण्याची वयोमर्यादा २५ वरून २१ वर्षांवर ! – देहलीमध्ये केजरीवाल सरकारचा निर्णय !

आधीच देशातील मद्यपींची संख्या वाढत असतांना त्यात आणखी भर टाकण्याचा आम आदमी सरकारचा प्रयत्न जनताद्रोहीच होय ! उद्या लहान मुलांनाही मद्यपान करण्याचा अधिकार राजकारण्यांनी दिल्यास आश्‍चर्य वाटू नये !

खाणीतून नागपूरच्या खासगी आस्थापनाच्या नावे निघालेल्या कोळशाची दुसरीकडेच विक्री

निलजई खाणीतील कोळसा नागपूरच्या प्राईड मेटल आस्थापनाच्या नावे पाठवण्यात आला; मात्र तो लालपुलीया येथील व्यापार्‍यांना विकला गेला. ७२ टन कोळसा, तसेच ३ ट्रकसह ७ जण कह्यात.

पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह ५० जणांवर गुन्हे नोंद !

शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तरीही भाजपने संबंधित आदेशाचे पालन न करत आंदोलन केल्यामुळे गुन्हा नोंद करण्यात आला आहे..

धामणी (जिल्हा सातारा) येथील डोंगराला लागलेल्या वणव्यामुळे घर जळून खाक

पाटण तालुक्यातील धामणी येथील डोंगराला लागलेल्या वणव्यामुळे डोंगरावर रहाणार्‍या एकनाथ बाबूराव नायकवाडी यांचे घर जळून खाक झाले आहे.

‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’कडून पुण्यात पुरातत्व विभागाची झाडाझडती !

कृती समितीने उपस्थित केलेल्या अनेक सूत्रांवर साहाय्यक संचालकांनी ‘निधी नाही, मनुष्यबळ अपुरे आहे’, अशी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. यानंतर कृती समितीचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी पुराव्यांसह अतिक्रमणांविषयी माहिती दिल्यावर साहाय्यक संचालक निरूत्तर झाले.

अशा घटना कधी थांबणार ?

बदायू (उत्तरप्रदेश) येथील मिहौना गावामध्ये एका साधूंची अमानुषपणे हत्या करून त्यांचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकल्याची घटना समोर आली आहे.

श्री. सत्यकाम कणगलेकर यांची ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप लिहिलेली वही आणि त्यांची ‘स्वभावदोष-निर्मूलन सारणी’ यांतून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेची परिणामकारकता वाढवण्यास आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्नही कसे साहाय्यभूत ठरतात, हे लेखातून लक्षात येते.