खाणीतून नागपूरच्या खासगी आस्थापनाच्या नावे निघालेल्या कोळशाची दुसरीकडेच विक्री

७२ टन कोळसा, तसेच ३ ट्रकसह ७ जण कह्यात

वणी (यवतमाळ), २३ मार्च (वार्ता.) – येथील निलजई खाणीतील कोळसा नागपूरच्या प्राईड मेटल आस्थापनाच्या नावे पाठवण्यात आला; मात्र तो लालपुलीया येथील व्यापार्‍यांना विकला गेला. याची कुणकुण पोलिसांना लागताच ठाणेदार वैभव जाधव यांनी ७२ टन कोळसा आणि ३ ट्रक यासमवेत ७ जणांना कह्यात घेतले. (केंद्रीय अन्वेषण यंत्रणा आणि व्हिजिलंसचे पथक यांनी उच्च प्रतीच्या कोळशाचा खाणीत तपास करूनही कोळशाची हेराफेरी थांबली नाही. तो रोडसेलमध्ये विकला जातो, हे अन्वेषण यंत्रणांसाठी लज्जास्पद आहे ! – संपादक)