लोकप्रतिनिधींकडून ही अपेक्षा नाही !
पुणे – गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी भाजपकडून पुण्यात २१ मार्च या दिवशी आंदोलन करण्यात आले होते. शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तरीही भाजपने संबंधित आदेशाचे पालन न करत आंदोलन केल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर आणि अन्य कार्यकर्ते यांसह ५० जणांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संसर्गजन्य रोगाला रोखण्यासाठी कोणतीही दक्षता न घेता स्वतः समवेत अन्य लोकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याने गुन्हा नोंद झाला आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांनी सांगितले.