
सातारा, २३ मार्च (वार्ता.) – पाटण तालुक्यातील धामणी येथील डोंगराला लागलेल्या वणव्यामुळे डोंगरावर रहाणार्या एकनाथ बाबूराव नायकवाडी यांचे घर जळून खाक झाले आहे. आग लागली, तेव्हा घरात कुणी नव्हते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीमध्ये १ लाख ८६ सहस्र रुपयांची हानी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दुपारी डोंगराला आग लागली. वाळलेल्या गवतामुळे आग वार्याच्या जोराने घराच्या दिशेने पसरत गेली. घराला आग लागलेली कळताच ग्रामस्थांनी घराच्या दिशेने धाव घेतली; मात्र तोपर्यंत आग सर्वदूर पसरली होती. घटनेची माहिती मिळताच मंडलाधिकारी प्रवीण शिंदे, तलाठी कोडापे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी करून घटनेचा पंचनामा केला आहे.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर