मद्यपान करण्याची वयोमर्यादा २५ वरून २१ वर्षांवर ! – देहलीमध्ये केजरीवाल सरकारचा निर्णय !

आधीच देशातील मद्यपींची संख्या वाढत असतांना त्यात आणखी भर टाकण्याचा आम आदमी सरकारचा प्रयत्न जनताद्रोहीच होय ! उद्या लहान मुलांनाही मद्यपान करण्याचा अधिकार राजकारण्यांनी दिल्यास आश्‍चर्य वाटू नये !

अरविंद केजरीवाल

नवी देहली – देहलीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने अबकारी धोरणामध्ये पालट करून राज्यात मद्य पिणार्‍यांच्या वयाच्या मर्यादा २५ वरून २१ वर्षांवर आणली आहे.

तसेच राज्यात यापुढे कोणतेही सरकारी दारूचे दुकान उघडण्यात येणार नाही, असेही सरकारने सांगितले. देशातील पंजाब, हरियाणा, चंडीगड आणि महाराष्ट्र येथे २५ वर्षे वयापेक्षा अल्प वयाच्या तरुणांना मद्यपान करण्यास बंदी आहे.