हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा

रायगड, २३ मार्च (वार्ता.) – शिवसेनेच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी कार्यरत असणारे आमदार श्री. मनोहरशेठ भोईर यांची रायगड जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड झाली आहे. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांची भेट घेण्यात आली. समितीचे रायगड जिल्हा समन्वयक श्री. राजेंद्र पावसकर यांनी त्यांना अभिनंदन पत्र देऊन सदिच्छा दिल्या. या वेळी समितीचे श्री. जयराज म्हात्रे आणि श्री. मानस म्हात्रे हे उपस्थित होते.
‘हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य पुष्कळ चांगले आहे. आम्ही अविरतपणे तुमच्या साहाय्यासाठी कार्यरत राहू’, असे उद्गार श्री. मनोहरशेठ भोईर यांनी या वेळी काढले.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !