विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला देहली येथील शेतकरी आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करणार्‍या ग्रेटा थनबर्ग हिला बोलावणार

देशातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना कार्यक्रमाला बोलावण्यामागील आयोजकांचा हेतू काय आहे ? याची चौकशी व्हायला हवी. या प्रकरणी दोषी असणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी !

कांटेसावर फुलांचे चूर्ण घेतल्याने झालेले लाभ !

‘गेले ३ मास मी वैद्य मेघराज पराडकर यांच्या सूचनेनुसार सकाळी आणि संध्याकाळी कांटेसावर फुलांचे चूर्ण घेतले. त्यामुळे मला पुढील लाभ झाले.

प्राचीन वैदिक ज्ञानाला अव्हेरून पाश्‍चात्त्य विज्ञानाच्या मागे धावणारे भारतीय !

कोलकातामध्ये १०० व्या विज्ञान काँग्रेस समारंभात तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशाच्या शास्त्रज्ञांना विज्ञानक्षेत्रात नोबेल पुरस्कार प्राप्त करण्याच्या दिशेने कार्य करण्याचे आवाहन केले.

आळेफाटा (पुणे) येथे वर कोबीची पोती लावून गोमांस वाहतूक, २ टन गोमांस जप्त

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस प्रशासन यावर कायद्याची प्रभावी कार्यवाही करणार का ?

श्री जोतिबा खेटे आयोजित करू नका ! – जिल्हाधिकार्‍यांचे देवस्थान व्यवस्थापन समितीला पत्र

मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत विधीस अनुमती

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे ५ परिवार देवता मंदिरांच्या जिर्णोद्धार कामाचे भूमीपूजन

५ परिवार देवतांच्या मंदिरांचा जिर्णोद्धार आणि श्री विठ्ठल मंदिरातील सभा मंडपाचे सुशोभिकरण या कामांचे भूमीपूजन २५ फेब्रुवारी या दिवशी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

गोवंशाची हत्या केल्याप्रकरणी ३ जणांवर गुन्हा नोंद

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता या घटनेतून दिसून येते !

सोलापूर-विजापूर राज्य मार्गावरील २५.५४ किलोमीटर रस्ता केवळ १८ घंट्यांत पूर्ण

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नुकतेच सोलापूर-विजापूर राज्य मार्गावरील रस्त्याचे चौपदरीकरण करतांना २५.५४ किलोमीटर (एक पदरी) रस्ता केवळ १८ घंट्यांत पूर्ण केला आहे. ठेकेदार आस्थापनाच्या ५०० कर्मचार्‍यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत.

सातारा पोलिसांची जुगाराच्या अड्ड्यावर धाड; ५० जणांना अटक

येथील शाहूपुरी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये चालू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये १० लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला असून ५० जणांना अटक करण्यात आली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात यावा, यासाठी न्यायालयात याचिका, ५ मार्च या दिवशी सुनावणी होणार

याचिकेत म्हटले आहे की, पूजा चव्हाण हिचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला असून तिच्या अनेक ऑडिओ क्लीपही प्रसारित झाल्या आहेत. यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींची नावे आहेत. असे असतांना या प्रकरणाचे सखोल अन्वेषण झालेले नाही. त्यामुळे आरोपी कधीही मृत्यूच्या प्रकरणातील पुरावे नष्ट करू शकतात.