पंडित नथुराम गोडसे यांचे विचार लोकांपर्यंत पोचवण्याची शपथ घेणार्‍या हिंदु महासभेच्या माजी नगरसेवकाचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश !

हिंदु महासभेचे माजी नगरसेवक बाबूलाला चौरसिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. चौरसिया यांनी पूर्वी पंडित नथुराम गोडसे यांचा न्यायालयातील शेवटचा संदेश १ लाख लोकांपर्यंत पोचवण्याची शपथ घेतली होती; मात्र आता राज्यातील पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

बंगालमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतर तृणमूल काँग्रेसने गंगाजल शिंपडून केली मैदानाची ‘शुद्धी’ !

येथील मैदानात २२ फेब्रुवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मैदानात जाऊन गंगाजल शिंपडून त्याचे ‘शुद्धीकरण’ केले. तृणमूल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप यादव यांच्या नेतृत्वाखाली हे शुद्धीकरण करण्यात आले.

पुणे येथील ७५ टक्के मुले-मुली सोळाव्या वर्षाआधीच ‘रिलेशनशिप’मध्ये

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ सारख्या गोष्टींना शासनकर्त्यांनी मान्यता दिल्याने जनतेचे चारित्र्य नष्ट होत आहे. हिंदु संस्कृतीपासून दूर जाऊन पाश्‍चात्त्य संस्कृतीशी जवळीक साधल्यामुळे त्याचे समाजात घडणारे दुष्परिणाम पुनःपुन्हा पुढे येऊ लागले आहेत.

अनंतनागमध्ये ४ आतंकवादी ठार

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथील सिरहामा भागात सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले. आणखी २-३ आतंकवादी लपले असल्याच्या शक्यतेने सायंकाळी उशिरापर्यंत येथे गोळीबार चालू होता.

गूगलकडून ‘गॉड ब्लेस यू’चे ‘भगवान आपका भला करे’ असे योग्य भाषांतर !

‘गूगल’ या ‘सर्चइंजिन’च्या ‘गूगल ट्रान्सलेटर’ या संकेतस्थळावर इंग्रजीमधील ‘गॉड ब्लेस यू’ या वाक्याचे हिंदीमध्ये भाषांतर करतांना ‘अस्सलाम अलैकुम’ असे उर्दूमध्ये भाषांतर दाखवण्यात येत होते. याचा प्रसार धर्मांधांकडून होत असल्याचे लक्षात आल्यावर धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी सामाजिक माध्यमांतून गूगलकडे याविषयी तक्रार केली.

‘इंडियन मुजाहिदीन’चा हात असल्याची शक्यता !

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल येथील ‘अ‍ॅन्टिलिया’ या निवासस्थानाच्या बाहेर स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके आढळलेल्या प्रकरणाचे अन्वेषण मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग १० पथकांद्वारे करत आहे. या गाडीमध्ये एक बॅग आढळली असून त्यावर ‘मुंबई इंडियन्स अल’ असे लिहिले आहे. यावरून यामागे ‘इंडियन मुजाहिदीन’ या आतंकवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खलिस्तानी आतंकवादाची पुनरावृत्ती !

खलिस्तानी चळवळीचे कंबरडे वेळीच मोडायला हवे आणि खलिस्तान्यांचाही समूळ नायनाट करायला हवा. जिहादी किंवा खलिस्तानी आतंकवादी असोत, त्यांचे समूळ उच्चाटन करणे, हे भारतासाठी क्रमप्राप्त आहे.

प्रत्येकाने स्वतःमध्ये शौर्य निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे ! – सुमित सागवेकर

महिलांकडे वाईट दृष्टीने बघणे, त्यांना विनाकारण धक्के देणे अशी विकृत मानसिकता असणार्‍यांना विरोध करण्यासाठी प्रत्येकानेच स्वतःमध्ये शौर्य निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे

१ मार्चपासून सप्ताहातील पाच दिवस सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस धावणार !

अकरा मासांच्या प्रतीक्षेनंतर मध्य रेल्वे सोलापूर विभागातील सोलापूर-पुणे-सोलापूर ही हुतात्मा एक्सप्रेस १ मार्चपासून धावणार असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली.

समर्थभक्त माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन  

कोरोनामुळे सर्वांनी शासनाचे नियम पाळून (मास्क लावणे, अंतर ठेवून बसणे आदी) स्वयंसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन महाशिवरात्र कीर्तन महोत्सव समितीचे संयोजक श्री. माधवराव गाडगीळ यांनी केले आहे.