पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात यावा, यासाठी न्यायालयात याचिका, ५ मार्च या दिवशी सुनावणी होणार

मुंबई – पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी तातडीने गुन्हा नोंदवण्यात यावा, यासाठी पुणे येथील जस्टीस लीग सोसायटीद्वारे भक्ती पांढरे यांनी तेथील लष्कर न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यावर सुनावणीसाठी न्यायालयाकडून ५ मार्च ही तारीख देण्यात आली आहे.

या याचिकेत म्हटले आहे की, पूजा चव्हाण हिचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला असून तिच्या अनेक ऑडिओ क्लीपही प्रसारित झाल्या आहेत. यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींची नावे आहेत. असे असतांना या प्रकरणाचे सखोल अन्वेषण झालेले नाही. त्यामुळे आरोपी कधीही मृत्यूच्या प्रकरणातील पुरावे नष्ट करू शकतात.