सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू प्रमोद शिंदे यांचे निधन

सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू प्रमोद शिंदे (वय ६५ वर्षे, रहाणार कळवा, जिल्हा ठाणे) यांचे ८ डिसेंबर या दिवशी दुपारी ३.५० वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

हिंदूंची मंदिरे मुक्त करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

देहलीतील कुतुब मिनार परिसरात असलेली मशीद २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून बांधण्यात आली असून तेथे पुन्हा मंदिरांची पुनर्उभारणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

झेवियरच्या शवपेटीच्या दुरुस्तीसाठी बासिलिका चर्च बंद रहाणार

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण १० डिसेंबरपासून झेवियरच्या शवाचे अवशेष असलेल्या शवपेटीच्या पुनर्रचनेचे काम करणार असल्याने बासिलिका ऑफ बॉम जिझस हे चर्च पर्यटक आणि तेथे भेट देणार्‍यांसाठी त्या दिवशी सकाळी ८ वाजताच्या प्रार्थनेनंतर बंद असेल

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी कोरोनाबाधित रुग्णांना ‘पीपीई किट’ घालून मतदान करावे लागेल

१२ डिसेंबर या दिवशी होणार्‍या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी कोरोनाबाधित रुग्णांना दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत ‘पीपीई किट’ घालून मतदान करावे लागणार आहे. शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर जि.पं. निवडणुकीसाठी नियमावली ९ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध केली आहे.

अशांची सर्व संपत्ती जप्त करा !

गोवा राज्याचे माजी निवडणूक आयुक्त आर्.के. श्रीवास्तव आणि त्या वेळचे देहली येथील सहकार सोसायटीचे उपनिबंधक पदम दत्त शर्मा यांना देहली येथील गुन्हे अन्वेषण न्यायालयाने घोटाळ्याच्या प्रकरणी २ वर्षांचा सश्रम कारावास आणि ३५ सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.

गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प जून २०२१ पर्यंत पूर्ण होणार

गोव्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प जून २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग खात्याचे अधिकारी पांडे यांनी चालू असलेल्या कामांची पहाणी केल्यानंतर दिली.

पू. नीलेश सिंगबाळ रामनाथी आश्रमात गेल्यानंतर वाराणसी सेवाकेंद्रातील त्यांच्या कक्षातून साधकांना सुगंध येऊन चैतन्य प्रक्षेपित होणे

‘पू. नीलेश सिंगबाळ काही कारणास्तव रामनाथी आश्रमात गेले. ३०.१०.२०२० या दिवशी त्यांचे वास्तव्य असलेल्या वाराणसी सेवाकेंद्रातील कक्षात गेल्यावर मला सुगंध आला.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .

ग्रहदोषांमुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय !

साधना केल्याने व्यक्तीचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. त्यामुळे सुख-दुःखाच्या प्रसंगांत ती स्थिर रहाण्याचा प्रयत्न करते. तिला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक स्तरांवर लाभ होतो, तसेच तिची आध्यात्मिक उन्नती होते.

‘अर्जुन पुरस्कार’ प्राप्त सुभेदार अजय सावंत यांचा पणजी (गोवा) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्कार

सुभेदार अजय सावंत यांचा सत्कार ! ‘कोणतेही राष्ट्र त्यातील सैनिक, किसान आणि शिक्षक या ३ क्षेत्रांच्या आधारावर टिकून रहाते. सैनिक प्राण तळहातावर घेऊन देशासाठी लढत असतो. त्यांचा सन्मान हा देशाचा सन्मान असतो.